Sunday, June 30, 2024 08:40:42 AM

चर्चा अमृता आणि शारीब यांच्या फोटोची  !

अमृता कायम नावीन्यपूर्ण आणि कमालीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते आणि अश्यातच आता ती 36 डे मध्ये नक्की काय भूमिका साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे

चर्चा अमृता आणि शारीब यांच्या फोटोची   

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 36 डे या नव्या प्रोजेक्ट ची घोषणा केली आणि लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे नुकतच या शो च दणक्यात प्रमोशन सुरू झालं असून अमृता आणि शारीब हाश्मी यांच्या फोटो ची चर्चा सोशल मीडिया वर बघायला मिळते. ते दोघे या प्रोजेक्ट साठी एकत्र काम करणार असून प्रेक्षकांना ही जोडी ओटीटी बघण्याची उत्सुकता आहे यात शंका नाही ! 

अमृता कायम नावीन्यपूर्ण आणि कमालीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते आणि अश्यातच आता ती 36 डे मध्ये नक्की काय भूमिका साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. २०२४ वर्षात अमृताने उत्तोमोत्तम भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची मन जिंकली. " लुटेरे , चाचा विधायक है हमारे ३ आणि आता 36 डे "सारखा कमालीचा प्रोजेक्ट ती करणार आहे.

या वेब सीरिज मध्ये अमृताच्या सोबतीने अनेक उत्कृष्ट कलाकारांची फौज आहे. अमृता आणि शारीब यांच्या सोबतीने या सिरीजमध्ये पूरब कोहली, श्रुती सेठ, चंदन रॉय सन्याल, सुशांत देवगीकर, शेरनाझ पटेल, फैशल रशीद, चाहत वीग आणि केनेथ देसाई यांच्या देखील भूमिका असणार आहेत.

अमृता आणि शारीब पहिल्यांदा एकत्र स्क्रीन स्पेस शेयर करणार असून हा वेब शो एक रहस्यमय कथा उलगडणार आहे. २०२४ या वर्षातला अमृता हिचा हा तिसरा बॉलिवुड प्रोजेक्ट ठरणार आहे. बॅक टू बॅक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणारी अमृता येणाऱ्या वर्षात अनेक नवनवीन भूमिका देखील साकारणार असल्याचं कळतंय.

आगामी काळात अमृता " कलावती , ललिता बाबर, पठ्ठे बापूराव “ या मराठी चित्रपटात देखील झळकणार आहे. अमृता सध्या ड्रामा ज्युनियर मध्ये जगिंग सुद्धा करताना दिसतेय. एकंदरीत २०२४ वर्ष अमृतासाठी वैविध्यपूर्ण भूमिकांच ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री